spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुरस्काराच्या रकमेतून समर्थ प्रा. शाळेचे लक्षवेधी सौंदर्यीकरण 

– मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ मध्ये तालुक्यात प्रथम 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक:- विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात तथा विविध उपक्रमातून नेहमी अग्रेसर असलेली रामटेक येथील समर्थ प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ सन २०२४ – २५ मध्ये रामटेक तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला असून या पुरस्काराच्या रकमेतून शाळेचे लक्षवेधी सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ सन २०२४-२५ मध्ये शाळेला तालुक्यातून पहिला क्रमांक मिळवून तिन लाखाच्या पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. यापूर्वी अभियानात टप्पा १ मध्ये सन २०२३-२४ मध्ये या शाळेने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावून दोन लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळविला होता. मिळालेल्या रकमेतून शाळेची लक्षवेधी रंगरंगोटी करण्यात आलेली असून शाळेतील भौतिक सुविधा तथा डिजिटलायझेशन सुद्धा करण्यात येत आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे व विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक सहाय्यता साक्षरता निर्माण करण्यासाठी शाळांना प्रेरित करण्यासाठी संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका तथा शिक्षकांची कसोशीने मेहनत व त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे पुरस्कारासाठी हीं शाळा सक्षम ठरली असून पुरस्काराच्या रकमेतून शाळेचे सौंदर्यकरण झाल्याने विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेण्यामध्ये एक वेगळाच उत्साह येत असल्याचे दिसून येत आहे.

 शिक्षकांची तारेवरची कसरत

‘ छडी लागे छमछम, विद्या येई घमघम ‘ अशी पुर्वीसारखी परिस्थिती आता शाळांमध्ये राहिली नाही तेव्हा मुलांकडून हे सर्व उपक्रम राबवून घेणे जणु शिक्षकांसाठी एक तारेवरची कसरतच आहे असे असले तरी मात्र समर्थ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये आवर्जून सहभाग घेत शिक्षकांना एक प्रकारे सहकार्यच केले आहे. खुप मोठ्या प्रमाणात उपक्रमे शाळेत गेल्या वर्षभऱ्यात राबविण्यात आले आहेत. अभियानाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेत शाळा सजावट, विविध वृक्ष लागवड त्याची जाेपासना, शाळा ईमारत व संरक्षण भिंत रंगरंगाेटी, डिजिटल वर्गखाेल्या ,मेरी माटी मेरा देश उपक्रम, परसबाग निर्मिती, नवसाक्षरता कार्यक्रम, स्वच्छता माँनिटर ,महावाचन चळवळ, विविध स्पर्धा, आराेग्य तपासणी, आजार तद्यांचे मार्गदर्शन, हात धुने उपक्रम, प्लास्टिक मुक्त शाळा, विविध संस्था व पालक यांचे शाळा विकासाकरीता याेगदान ईत्यादी उपक्रम राबविल्या गेले. अशा विविध स्पर्धा व उपक्रमांतून मुलांचा भरघोस विकास होण्यासही भर पडली आहे.

Popular Articles