spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बंडखोर फोडू लागले नेत्यांच्या सभेत घाम !

– मंत्री बावनकुळे यांच्या सभेत भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा गोंधळ , स्टेजवर येत विचारू लागला जाब

चंद्रपूर :- चंद्रपूरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत भाजप बंडखोर उमेदवार राकेश बोमनवार अचानक आल्याने गोंधळ उडाला मंचावरील नेत्यांची अवस्था अवघड झाली. बावनकुळे यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्नात असलेल्या बोमनवार यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी स्टेजखाली उतरवले. त्यानंतर बोमनवार यांची भाजप कार्यकर्त्यांसोबत झटापट झाल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले.

जटपुरा प्रभागातून बोमनवार यांनी भाजपची उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून बोमनवार यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्ष छबु वैरागडे यांच्या सोबत एबी फॉर्म वाटपाच्या दिवशी सुद्धा वाद घातला होता.

Popular Articles