spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

NEED स्पोर्टिंग क्लबचा सामाजिक उपक्रम : कबड्डीमधून रोजगारनिर्मितीचा नवा आदर्श

पांढरकवडा :- मारेगाव तालुक्यातील खैरगाव भेदी येथील निड सामाजिक संस्थे द्वारा संचालित NEED स्पोर्टिंग क्लबच्या वतीने गेल्या ८ वर्षांपासून सातत्याने कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, “खेळापासून कौशल्य” या संकल्पनेतून युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे.

“१०० गावांचे १००० तरुण” या उद्दिष्टाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत युवकांना केवळ खेळापुरते मर्यादित न ठेवता विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी युवकांकडून गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये सलून, बँड, मच्छीमारी, सुतारकाम, प्लंबिंग आदी कौशल्याधारित प्रशिक्षणांचा समावेश आहे. आतापर्यंत या माध्यमातून ३५० हून अधिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती झाली असून, काही युवकांना दरमहा १५ हजारांपासून ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

कबड्डी खेळ आता केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता रोजगारनिर्मितीचे साधन बनत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि विविध संस्थांच्या आर्थिक सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. पुणे येथील सेवा सहयोग, सह्याद्री फाऊंडेशन यांच्यासह रवी काबरा, राहुल व नीलम मंत्री, गिरिजा शिरसिकर, सुहासिनी बिवलकर, सुषमा जोशी, सागर देशपांडे, अभिजित शिराडकर, पल्लवी इंगळे, राम मत्ते, रमेश जी, विजय चोरडिया, किरण दिकुंडवार आदी अनेक मान्यवरांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले आहे. दरम्यान, २६ व २७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित विशेष उपक्रमांच्या माध्यमातून जवळपास २०० लोकांना रोजगार देण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. NEED स्पोर्टिंग क्लबचा हा उपक्रम ग्रामीण व निमशहरी भागातील तरुणांसाठी आशेचा किरण ठरत असून, खेळातून समाजपरिवर्तनाचा आदर्श निर्माण करत आहे.

Popular Articles