spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाप्रज्ञा बौद्ध विहार तिरोडाला वाढदिवसा प्रीतर्थ धम्मदान

तिरोडा :- येथील महाप्रज्ञा बौद्ध विहार, रेल्वे चौकी तिरोडा येथे महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती, तिरोडा ला दि.१०/०१/२०२६ रोजी राहुल बडगे यांनी त्यांच्या वाढ दिवसा प्रीतर्थ २५ प्लास्टिक खुर्च्या किंमत ११२५०/- रूपये चे धम्म दान केले.

या प्रसंगी कार्यक्रमाला महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे कार्यकारी अध्यक्ष महेंद्र बडगे, सचिव प्रवीण चव्हाण, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, संघटक पवन वासनिक, मार्गदर्शक सुरेश बन्सोड, के.के. वैद्य, सहसचिव महेंद्र वालदे, मनिंद्र बन्सोड, कार्यकारणी सदस्य पवन वाघमारे, राहुल बडगे, लंकेश टेंभेकर, प्रवीण नंदागवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे राहुल बडगे आणि दीपा राहुल बडगे यांनी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून त्यांच्या तर्फे सामूहिक बुद्ध वंदना करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला सर्व उपस्थितांचे व दानदाते राहुल बडगे यांचे आभार संघटक पवन वासनिक यांनी मानले.

Popular Articles