spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खरी कमाई ‘ द्वारे चिमुकल्यांनी गिरविले व्यवहाराचे धडे

– समर्थ प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ चे आयोजन

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- शहरातील समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच दि. १० जानेवारीला आनंद मेळाव्याचे शाळा व्यवस्थापनामार्फत आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान वर्ग ३ व ४ च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध चविष्ट व्यंजनांचे स्टॉल लावत व त्याची विक्री करत व्यवहाराचे ज्ञान आत्मसात केले. यासाठी त्यांना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जंजाळ व शिक्षकांनी प्रोत्साहन दिले होते हे येथे उल्लेखनीय. आनंददायी शनिवार अंतर्गत समर्थ प्राथमिक शाळा, रामटेक, येथे “बाल वयातच व्यवहार ज्ञानाचे धडे दिल्यास चांगले संस्कारक्षम पिढी घडविण्यास मदत होते या दृष्टिकोनातून “बाल आनंद मेळाव्याचे*” आयोजन करण्यात आले होते. आनंद मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक सुमित कोठारी, नगरसेविका सुरेखा माकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मिडल स्कूल विभागाच्या विभाग प्रमुख किंमतकर, पालक कोतपल्लीवार, आकाश ढोबळे तसेच इतर पालक वर्ग तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जोंजाळ सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. आनंद मेळावा मध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे जसे कच्चा चिवडा, समोसा, ब्रेडपकोडा, आप्पे ,दहिपुरी ,पाणीपुरी, पोहे , मेदुवाडा, इडली, ढोकळा, पुलाव, नुडल्स, पिंगर , पास्ता, उकडलेली बोरं इत्यादी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच या मेळाव्या मधून व्यवहार ज्ञान आत्मसात केले. आनंददायी, उत्साहपूर्ण वातावरणात आनंद मेळावा पार पडला. सदर कार्यक्रम मुख्याध्यापिका जोंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Popular Articles