सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- “अपंगत्व समजून घेतांना” हा अत्यंत प्रेरणादायी व जनजागृतीपर उपक्रम स्व. सदाशिवराव किंमतकर नगर परिषद प्राथमिक शाळा,रामटेक येथे यशस्वीरीत्या राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेती दिक्षा दिंडे (पुणे) यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अपंगत्वावर मात करून समाजाला नवी दिशा देणारी दिक्षा दिंडे इचा सत्कार करण्याचा सन्मान मिळाला. आपल्या प्रभावी शब्दांतून त्यांनी अपंगत्व म्हणजे मर्यादा नसून, योग्य संधी, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण यशाच्या पायरीत बदलू शकते, हा संदेश विद्यार्थ्यांना व उपस्थितांना दिला. त्यांच्या जीवनप्रवासातून मिळालेली प्रेरणा सर्वांसाठी दिशादर्शक ठरली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, समावेशाची भावना व सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत झाली. यावेळी नगरपरिषद रामटेकचे नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, नगरसेवक आलोक मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षकवृंद, कर्मचारी व सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा उपक्रमांतूनच समतामूलक, समावेशक व प्रेरणादायी समाज घडवण्याची प्रक्रिया अधिक बळकट होईल.
अपंगत्व समजून घेतांना…!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



