…. अखेर ग्रा प निमखेडा चे ग्रा पं सदस्य तथा कृषी सेवा केंद्राचे संचालक पूर्णचंद्रराव वेमूरी यांच्या प्रयत्नांना यश

0
45

– लिंकिंग युक्त खते खरेदी न करण्याच्या नागपूर जिल्हा कृषी डीलर्स असोसिएशनच्या सभेत निर्णय

किशोर साहू, मौदा, ता.१४:- गुरुवार (दि. 8 जानेवारी)ला मौदा तालुक्यातील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी विपीण इटनकर यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जनसंवाद कार्यक्रमात ग्रा प निमखेडा चे ग्रा पं सदस्य तथा कृषी सेवा केंद्र संचालक पूर्णचंद्रराव वेमूरी यांनी मागील एक वर्षापूर्वी पासून कृषी सेवा केंद्र चालक व शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या खताच्या लिंकिंग समस्येबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाला त्या कार्यक्रमात उपस्थित तालुक्यातील सर्व सरपंच मंडळींनी सहमती दर्शविली होती. निवेदन देण्यापूर्वी त्यांनी विविध हिंदी, मराठी दैनिक, सायं. दैनिक मधून व वेब पोर्टलच्या माध्यमातून दोनदा या समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अखेर त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन शनिवार (दि. 10 जानेवारी)ला रोजी नागपूर डिस्ट्रिक्ट ऍग्रो डिलर्स असोसिएशन च्या सभेमध्ये जिल्ह्याचे पदाधिकारी व प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष व सचिव यांच्या उपस्थितीत शनिवार (दि.10 जानेवारी) पासून नागपूर जिल्ह्यातील कोणताही विक्रेता व वितरक लिंकिंग युक्त खताची खरेदी करणार नाही. सहकारी संस्था किंवा इतर जिल्ह्यातील वितरकांकडून सुद्धा नाही. तसेच कंपनीचे डायरेक्ट डिलर असलेले विक्रेता सुद्धा लिंकिंग युक्त खताची खरेदी करणारे नाही.

जो विक्रेता किंवा वितरक वरील नियम पाळणार नाही त्या विक्रेता व वितरक सोबत कोणताच डिलर किंवा डिस्ट्रिब्युटर पुढील व्यवहार करणारे नाही व नियम तोडणाऱ्या विक्रेत्याचे नाव व्हाट्सअँप ग्रुप वर जाहीर रित्या प्रकाशित करण्यात येणार आहे.

नागपूर डिस्ट्रिक्ट ऍग्रो डीलर असोसिएशन च्या या निर्णयाचे वेमूरी यांच्यासह मौदा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी अभिनंदन केले असून जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणाऱ्या जिल्हाधिकारी विपीन ईटणकर व या समस्येला वाचा फोडणाऱ्या विविध माध्यमांचे आभार मानले आहे.