spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे तीन दिवसीय मंडईला आजपासून भव्य इनामी आमदंगल ने सुरुवात

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर येथे मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर चाचेर येथे उद्या गुरुवार (दि. 15 जानेवारी) पासून तीन दिवसीय मंडईची सुरुवात दुपारी 2 वाजतापासून हनुमान मंदिर समोर भव्य इनामी आमदंगलने होणार आहे. शुक्रवार 16 जानेवारीला पहाटे 4 ते सकाळी 10 पर्यंत बाजार चौक येथे चाचेर येथील शाहीर पुरुषोत्तम साथी कंठीराम यांच्या दंडारीच्या कार्यक्रम, सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत काटोल येथील सुप्रसिद्ध कव्वाल युट्युब चॅनेल सिंगर भिमेश /भारती व संच विरुद्ध मुंबईवाली सुप्रसिद्ध कव्वाली गायिका धम्मज्योती शिंदे यांच्या दुय्यम कव्वाली मुकाबला, शनिवार17 जानेवारीला पहाटे 4 ते सकाळी 10 पर्यंत बाजार चौक येथे शाहीर नामदेव साथी अरुण यांच्या दंडारीच्या कार्यक्रम तर सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सोमलवाडा (लाखनी) येथील शाहीर आर्यन विरुद्ध

वघ पारडी (कुही) येथील शाहिर निशान सुखदेवे यांच्या दुय्यम खडा तमाशा मुकाबला , तर रविवार दिनांक 18 जानेवारीला सायंकाळी चार वाजता हनुमान मंदिर परिसरात भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,राज्यमंत्री आशिष जयस्वाल ,खासदार श्यामकुमार बर्वे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक उपस्थित राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृपाल तुमाने माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,टेकचंद सावरकर, जि प नागपूर माजी पदाधिकारी व जिल्ह्यातील पुढारी वर्ग रश्मी बर्वे, चंद्रपाल चौकसे ,प्रकाश जाधव ,दुधाराम सव्वालाखे, अवंतिका लेकुरवाळे, देवेंद्र गोडबोले ,गजू यादव, रमेश कारेमोरे, कैलास बरबटे, लक्ष्मण उमाळे ,प्रमोद बरबटे ,खेमराज चाफले, शालिनी बाळा देशमुख, नंदा लोहबरे, महेश कलारे, संकेत झाडे, ज्ञानेश्वर वानखडे ,बाळकृष्ण खंडाईत, नलिनी कृष्णा टिकले, उमेश झलके ,वनिता नौकारकर, सुनिता सिंधू यांगटी ,नागेश्वरी कडू ,वैशाली आनंद लेंडे ,रघुनाथ सहारे ,धर्मराज बावनकुळे ,मदन बरबटे, राहुल बावणे , संजू वाघमारे,अशोक बावनकुळे विनोद कोपरकर, रोशन मेश्राम, लुम्बिनी महेश कलारे, रवींद्र ठाकरे सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या मंडई उत्सव कार्यक्रमाचा व आनंद मेळाव्याच्या लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक ग्रामपंचायत चाचेर व मंडई उत्सव समितीचे पदाधिकारी रवींद्र ठाकरे, महेश कलारे, ज्ञानेश्वर नाकाडे ,प्रकाश काळे, सुरेंद्र टेंभरे ,कवडू मेश्राम ,शैलेश कोपरकार सह समस्त सदस्य गण व चाचेरवासीयांनी केले आहे.

Popular Articles