spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नायलॉन मांजा वर प्रतिबंध करणे कामी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीसांनी ३६ आरोपीतांना केले स्थानबध्द

नागपूर :-  मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजावर प्रतिबंध करणेकामी हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात नागपूर ग्रामीण पोलीसांनी नुकत्याच दाखल झालेल्या नायलॉन मांजा प्रकरणातील नायलॉन मांजा वापरून पतंग उडविणारे आणि विक्री करणारे ३६ आरोपींना आज सुर्यास्तापर्यंत स्थानबद्ध करण्यात आले. सर्व ठाणे प्रभारी अधिकारी आपआपल्या हददीत सर्तक पेट्रोलींग करून नायलॉन मांजा वापरकर्ते आणि विक्रेते यांचे वर लक्ष ठेवुन आहे. नायलॉन मांजा कायद्याने पूर्णपणे बंद असून, उल्लंघन करणाऱ्यांवर खलील प्रमाणे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कोणतीही व्यक्ती नायलॉन मांजासह पतंग उडवताना आढळल्यास २५,०००/- दंड कोणताही विक्रेता नायलॉन मांजाचा साठा बाळगताना आढळल्यास, त्यास रुपये २,५०,०००/- इतका दंड तसेच अल्पवयीन बालाकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या पालकांकडून दंड वसूल करण्यात येईल, हा दंड प्रत्येक उल्लंघनासाठी लागू राहील.

Popular Articles