यवतमाळ :- येत्या 26 व 27 जानेवारी हिंगोली येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनात विभाग सह यवतमाळ जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेता बंधूंनी व सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर हजर राहावे असे आवाहन राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार व राज्य उपाध्यक्ष संतोष शिरभाते यांच्यासह यवतमाळ जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांनी केले आहे हे अधिवेशन संत नामदेव महाराज यांच्या भूमीत महावीर भवन हिंगोली येथे संपन्न होत असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव किरण कोरडे, श्रीराम खत्री, सचिन कदम राजू हनवते राजू भलावी मदन केळापूरे तुषार गुजलवार प्रवीण आगलावे सुनील बोरकर यांच्यासह पदाधिकारी यांनी केले.








