नागपूर :- नागपूर येथील रहिवासी व पी टी पाटील यांच्या कन्या रोहिणी पाटील रामटेके यांनी 7 ते 11 जानेवारी 2026 रोजी फरीदाबाद (हरियाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय इक्विप्ट बेंचप्रेस स्पर्धेत पुण्याच्या रोहिणी रामटेके यांनी सुवर्णपदक प्राप्त करून त्यांचे कोच इंटरनॅशनल पॉवरलिफ्टर ज्योती भादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी 99 फिटनेस ॲन्ड स्पोर्ट्स अकॅडमी नऱ्हे येथे सराव करत आहेत. या अकॅडमी मध्ये पॉवरलिफ्टिंग चे विशेष प्रशिक्षण दिले जाते. वयाच्या 43 व्या वर्षी रोहिणी यांनी बेंचप्रेस प्रकारात 63 किलो वजनी गटात 92.5 किलो वजन उचलून इतर स्पर्धकान पेक्षा 20 किलो पेक्षा जास्त फरकाने विजय मिळवत सुवर्ण पदक मिळवले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी प्रशिक्षक ज्योती मॅडम आणि आपल्या कुटुंबियांना दिले आहे. तसेच त्यांचा यशामागे आर्यन म्हस्के गिरीश बिंजवे तसेच संपूर्ण टीमचंही मोलाचे योगदान लाभले. घरगुती महिला ते राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती असा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असून वय ही केवळ एक संख्या आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.








