spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अधिवेशन संपण्याच्या अगोदर रद्द केलेला १५ कोटी रुपयांचा निधी परत आणा –  देवेंद्र भुयार

यावलकरांनी 3 अधिवेशनात किती निधी मंजूर करून आणला ते जनतेसमोर सांगावा !
मी मंजूर करून आणलेल्या निधीचे भूमिपूजन करणे बंद करा व स्वतः निधी आना आणि नारळ फोडा !
मोर्शी १८  :-  मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड मोर्शी शेघाट नगर परिषद क्षेत्रामध्ये विविध सामाजिक विकासासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता मात्र तो विद्यमान आमदार उमेश यावलकर यांनी रद्द केल्यामुळे मोर्शी विधासभा मतदार संघामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आज दिनांक १७ जुलै रोजी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी विद्यमान आमदार उमेश यावलकर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मोर्शी येथील विश्रामगृहामधे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या संपूर्ण आरोपांचे खंडण करून मोशी वरूड शेघाट नगर परिषद क्षेत्रातील रद्द केलेला १५ कोटी रुपयांचा निधी अधिवेशन संपण्याआधी विद्यमान आमदारांनी मंजूर करून आणावा असे आवाहन माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
     2019 ते 2024 या काळामध्ये मी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विद्यमान आमदारांनी देवेंद्र भुयार यांच्यावर केला यामध्ये एखाद्या कामांमध्ये मी स्वतः भ्रष्टाचार केला असल्याचे त्यांनी उघडकीस आणावे त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे त्याचा उपयोग करून माझा भ्रष्टाचार जनतेसमोर समोर आणावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
    मी काही प्रस्थापित लोकांची ठेकेदारांची मक्तेदारी मोडून नवीन तरुणाच्या हातांना काम मिळावे म्हणून प्रयत्न केले एक पैशाचे कमिशन घेतले नाही आणि तरुणांच्या हाताला काम दिली सामान्य घरच्या तरुणांना समोर आणण्याचे काम मी केलं मी कोणत्याही तरुणाला वाईट व्यसनाच्या मार्गी लावले नाही त्यांच्या हातात दगड तलवारी दिल्या नाही आणि जाती धर्माच्या पक्षाच्या नावाखाली मी कुठल्याही तरुणांकडून काम करून घेतले नाही एखादा उदाहरण त्यांनी दाखवावे आणि ज्यांना मी जादा कामे देऊ शकलो नाही ते माझ्यावर स्वाभाविक नाराज असू शकते परंतु त्या तरुणांना मी  वाईट मार्गाने लावले नाही.  माझ्यावर निवडणुकीच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी हमला केला त्यावेळी मी कोर्टामध्ये आरोपीची नावे दिली आहे डॉक्टर अनिलजी बोडे यांनी माझ्यावर अपील दाखल केली आहे कोर्टाच्या निर्णयांत ते सर्व स्पष्ट होईल.
    ठाणाठूनी येथील संत्रा प्रकल्प हा खाजगी भागीदाराचा जैन आणि कोका कोला चा प्रकल्प असून तेथे मी ज्या ज्या सुविधा आवश्यक होत्या उदाहरणार्थ रस्ता वीज पाणी विविध कामासाठी निधी उपलब्ध केला जैन कंपनी अवसानात सापडल्यामुळे हा प्रकल्प उभा राहू शकला नाही हा प्रकल्प बंद पडण्यामागे माझा कुठलाही संबंध नाही जैन ला माझे सहकार्य नेहमीच होतं आणि यापुढे सुद्धा राहील.
    मी जनतेची कामे करण्यामध्ये कमी पडलो असेल लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी कमी पडलो असेल मतदारसंघांमध्ये अनपेक्षित कामे झाली नसेल परंतु जास्तीत जास्त निधी आणून आरोग्य शिक्षण दळणवळण यासह विविध विकास कामे पूर्ण करणे ही जर जनतेसोबत केलेली  बेइमानी असेल तर ती बेईमानी मी वारंवार करण्यास तयार आहे. मी स्वच्छ हेतूने मतदारसंघात 5 हजार दोनशे कोटी निधी आणला यावलकरं साहेबांनी यातील 50 टक्के निधी आणून दाखवावा.
 मी जातीपातीचे कधी राजकारण केले नाही मी  सर्व समाजाला न्याय देण्याचे प्रामाणिक काम केलं जी प्रशासकीय मान्यता आपण रद्द केली त्यामध्येच आपण पाहू शकता की मी सर्व धर्माला समाजाला घेऊन चालण्याचे काम केलं मी स्वर्गीय महादेवराव अंडे यांच्या नावाने अभ्यासिका निर्माण केले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करून दाखवला संत सावता माळी महाराज सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. माजी नगराध्यक्ष स्वाती अंडे यांच्यावर अविश्वास ठराव स्वतः विद्यमान आमदारांनी आणला होता त्यांचा पाच वर्षाचा कार्यकार मी पूर्ण करण्यास त्यांना मदत केली व सहकार्य केले त्यामुळे त्या पाच वर्षात चांगले काम करू शकल्या . स्वर्गीय राजूभाऊ काळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीच्या विरोधात यावलकर उभे होते त्यांच्या नावाने सुद्धा मी अभ्यासिका मंजूर करून घेतली असे अनेक कामे सर्व समाजाच्या हितासाठी मंजूर करून आणले.
   आमदार यावलकर उमेश यावलकर यांनी विचारपूर्वक नाहीतर अज्ञानामुळे व आर्थिक व्यवहारासाठी सदर निधी रद्द केला हे सिद्ध होत असल्याचा आरोप यावेळी देवेंद्र भुयार यांनी केला.
मतदार संघामध्ये सर्व समाजासाठी निर्माण होत असलेले सभागृह मदिर प्रार्थना स्थळे रद्द करणे चांगले नाही एखाद्या एखाद्या समाजाजवळ सभागृहासाठी जागा उपलब्ध नाही त्यांना उपस्थित जागा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची लोकप्रतिनिधी ची जबाबदारी आहे  माझा कार्यकाळात विविध ठिकाणच्या कामासाठी जागा उपलब्ध होत नसताना सुद्धा तिथे जागा उपलब्ध करून घेतल्या व ती कामे पूर्ण केली. विद्यमान आमदार आणि नगर परिषदेमध्ये अनेक वेळा बैठका घेतल्या तेव्हा त्यांनी या कामासाठी जागा का उपलब्ध करून दिल्या नाही हा मोठा प्रश्न असून पैसे रद्द करणे हा त्यातील मार्ग नव्हता मंदिरापेक्षा गार्डन महत्वाचे आहे का रामाच्या भरोशावर तुम्ही सत्तेत आले आमदार झाले त्याच प्रभू रामचंद्राची एक नाहीतर दोन मंदिराचे कामे रद्द केले. आज आमच्या बजरंगी बांधवांना विनंती आहे ज्याप्रमाणे माझा दोष नसताना माझ्यावर घरावर तुम्ही आंदोलन केले त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्राचे कामे रद्द करणाऱ्या यावलकरांच्या घरावर आंदोलन करण्याचा धाडस दाखवणार का कारण बजरंगी हे कोणत्या पक्षाचे नसतात असं मी ऐकलंय बजरंगी हे धर्माचे रक्षक असतात.म्हणून प्रभू रामचंद्र च्या मंदिराचे रक्षण ते निश्चितच करेल. अधिवेशन संपण्या अगोदर सदर निधी कुठलीही कारण न सांगता मतदार संघात आणणार का 3 अधिवेशनात आपण किती निधी मंजूर करून आणला 9 महिन्यात तुम्ही पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या निधीची एखादी प्रशासकीय मान्यता जनतेसमोर दाखवावी विद्यमान आमदार चंदू यावलकर यांना माझा प्रश्न असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेला माजी आमदार देवेंद्र भुयार, सामाजिक कार्यकर्ते नीलेश रोडे, नगरसेवक नईम खान, आनंद तायडे, विनोद गेडाम, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रीय प्रदेश सेल सदस्य महेश नागले,  राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष रुपेश वाळके , विपुल हिवसे, हितेश साबळे,  कार्याध्यक्ष हितेश उंदरे, यांना सैय्यद गफ्फार , शकील भाई, इसरारभाई सरताज, घनश्याम कळंबे, दिनेश टिपरे, दिलीप गवई, पंकज हरणे, मयूर राऊत, राज बडोदेकर, अक्षय ढोमणे, अभिजित सावरकर, राहुल आमले, सतीश धुताले, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.