कन्हान १८ : – वराडा शिवारातील नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील जियो पेट्रोल पंप समोर वाहना च्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यु झाल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मंगळवार (दि.१५) जुलै ला सायंकाळी ६:३० वाजता दरम्यान वराडा शिवारातील नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गवर जियो पेट्रोल पंप समोर रोडच्या मध्यभागी एक अनोळखी वेडसर इसम वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष हा रोडच्या मधातुन चालत असतांना कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्या तील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजी पणाने चालवुन इसमाला जोरदार धडक दिली. यात इसमाचा डोक्याला गंभीर मार लागल्याने इसमाचा घटनास्थळी मृत्यु झाला. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे, पोली स हवालदार जैलाल सहारे सह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेण्यात आले. या प्रकरणी कन्हान पोली सांनी सरकार तर्फे फिर्यादी पो हवा जैलाल सहारे यांचे तक्रारीवरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाख ल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.




