नागपूर १८ : महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून काँग्रेस-राका व भाजपा-सेना यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता भोगली, परंतु सर्वसामान्यांच्या समस्या अजूनही जैसे थे आहेत. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत भागीदारी मिळवून सर्वसामान्यांना समस्या मुक्त करण्यासाठी बसपा सडक, बिजली, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदि सोई मुबलक प्रमाणात पुरविण्यासाठी बसपा निवडणूक लढेल व जिंकेल सुद्धा असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रदेशाध्यक्ष एड सुनील डोंगरे यांनी व्यक्त केला.
काल बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने बहुजन भवनात कार्यकर्ता संमेलन व समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रदेशाध्यक्ष बोलत होते. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, नागोराव जयकर, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी रंजनाताई ढोरे, एड राहुल सोनटक्के, राजकुमार बोरकर, मोहम्मद इब्राहिम प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू चांदेकर यांनी, सूत्रसंचालन अध्यक्ष योगीराज लांजेवार यांनी तर समारोप जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे यांनी केला. याप्रसंगी बसपा नेत्यांनी नागपूर ग्रामीण मधील जिल्हा परिषदच्या सर्कलची व नागपुरातील निवडक प्रभागांची अ ब क नुसार निवड केली. सोबतच निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांशीही चर्चा करून निवडणुकीपर्यंत संघटन बांधणीवर जोर देण्यात आला.
याप्रसंगी हिंगणा विधानसभेचे सुरेंद्र डोंगरे, सुरेश मानवटकर, कामठीचे चंद्रगुप्त रंगारी, तारा गौरखेडे, काटोलचे रुपराव नारनवरे, पूर्व नागपूरचे संजय लीखार, धम्मपाल गोंगले, हर्षवर्धन डोईफोडे, दक्षिण नागपूरचे सहदेव पील्लेवान, आनंद सोमकुवर, पश्चिम नागपूरचे अंकित थुल, अभिलेश वाहाने, यशवंत निकोसे, मध्य नागपूरचे विलास पाटील, उत्तर नागपूरचे राजेश नंदेश्वर, उमेश मेश्राम, अजय उके, प्रीती बोदेले, कविता लांडगे, वर्षा सहारे आदींनी आपापल्या विधानसभेतील संघटन बांधणी चा अहवाल दिला.




