भंडारा, दि .१८ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांचेद्वारा जिल्हयातील सुरक्षा क्षेत्रात नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 16 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 ते दूपारी 3.00 या वेळेत पंचायत समिती लाखनी या ठिकाणी विशेष रोजगार भरती मेळावा संपन्न झाला.
सदर रोजगार भरती मेळाव्यात Guardian Security Solutions Pvt.Ltd.Hydrabad या सुरक्षा क्षेत्रातील कंपनीमार्फत Security Guard आणि Security Supervisor या पदांच्या भरतीकरीता विशेष रोजगार मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्याकरीता आश्विनी मोहतुरे सभापती पंचायत समिती लाखनी,डॉ.सुधाकर झळके सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, आशालता वालदे कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कंपनीकडून हरींद्रवार हे उपस्थित होते. सदर रोजगार भरती मेळाव्यात एकूण 52 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी 34 उमेदवारांची अंतिम निवड होऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले.
यावेळी, डॉ.सुधाकर झळके सहायक आयुक्त यांनी उपस्थित उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात संधी उपलब्ध असून उमेदवारांनी त्याचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी आपल्यामधील कौशल्ये विकसित करून स्वत:ला सिध्द केले पाहीजे. खाजगी क्षेत्रामध्ये कुशल मनूष्यबळाला मोठया प्रमाणात मागणी व मुबलक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, उमेदवारांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवून शासकीय नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहीजे.स्वत:मधील गुणदोष ओळखुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली पाहीजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील झळके, सहायक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली श.क.सय्यद वरिष्ठ लिपीक, आशालता वालदे वरिष्ठ लिपीक, प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक,सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, ऐजाज शेख शिपाई तसेच, पंचायत समिती लाखनी येथील अधिकारी व कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.




