किशोर साहू, मौदा, ता. 22 :- दरवर्षीप्रमाणे यंदाही जय हनुमान देवस्थान निमखेडा येथे पंचकमिटीतर्फे हनुमंत रायाच्या कृपेने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन उद्या गुरुवार (दि. 22 जानेवारी) ते गुरुवार (दि. 29 जानेवारी )पर्यंत करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगर, मुंडेफळ श्री संत हेनानी बाबा नगरी , ह भ प राम महाराज चांदणे पाटील हे भागवताचार्य असून त्यांना भागवत संच गायक जितू महाराज चिंचुळकर झाकी, दर्शन महाराज, तबला अंकेश महाराज नागपुरे, कीबोर्ड चरण महाराज वानखेडे, पॅड वादक सुशील महाराज पवार हे त्यांचे सहकारी सहकार्य करणार आहेत. सकाळी सहा ते सात काकड आरती सकाळी सात ते आठ राम धुन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सात ते दहा श्रीमद् भागवत कथा असे दैनंदिन कार्यक्रम राहणार आहेत.
बुधवार (दि.28 जानेवारी)ला दुपारी चार वाजता भव्य शोभायात्रा गुरुवार (दि.29 जानेवारी) ला सकाळी दहा ते बारा भागवताचार्य श्री राम महाराज चांदणे यांचे काल्याचे किर्तन, सकाळी साडेबारा ते दीड गोपाळकाला व दहीहंडी फोडण्यात येईल दुपारी दोन वाजता पासून भव्य महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.
तरी या अमृतमय सुवर्णसंधीचा व सुखाचा समस्त भागवत भक्तांनी अवश्य लाभ घेऊन तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आव्हान जय हनुमान देवस्थान पंच कमिटी निमखेडा तर्फे करण्यात आले आहे आहे.




