spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा सामान्य रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील भंडारा जिल्हयातील जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा यांचेकडे हस्तांतरीत होत आहे.तसे अधिष्ठाता शासकीय वैदयकीय महाविदयालय दुधगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवले आहे .

नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे सध्या १०० विद्यार्थी प्रवेश व ४३० खाटा क्षमतेसह कार्यरत आहे. महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम अद्याप पुर्ण झालेले नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार नविन स्त्री रुग्णालय, व जिल्हा सामान्य रुग्णालय, च्या सुविधा तात्पुरत्या स्वरुपात महाविद्यालयाच्या वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

याच ठिकाणी वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा सुरळीतपणे सुरु राहणार आहेत. पुढील काळात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे तात्पुरत्या स्वरुपात रुपांतरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा मध्ये करण्यात येणार असुन येथे तृतीय स्तरीय आरोग्य सेवा उपलब्ध होईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या तृतीय स्तरीय आरोग्य सेवांसाठी शासनाने निर्धारीत केलेल्या नियमानुसार रुग्णशुल्क आकारण्यात येईल. या प्रकल्पामुळे भंडारा परिसरातील नागरीकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहेत.असे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा यांनी कळवले आहे.

Popular Articles