– केपटाऊन येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत यकृताला बायपास करणाऱ्या असामान्य रक्तवाहिन्यांवरील उपचारांचे केले सादरीकरण
नागपूर :- नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रसाठी अभिमानास्पद कामगिरी ठरावी, अशी उल्लेखनीय कामगिरी मिडास रुग्णालयाचे संचालक आणि ज्येष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ मुकेवार यांनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे आयोजित वर्ल्ड एन्डोस्कोपी ऑर्गनायझेशन (WEO) च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना प्रतिष्ठेच्या ‘वर्ल्ड कप ऑफ एन्डोस्कोपी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.








