Home Latest News आपल्याच वाळूसाठी मोजावे लागणार पैसे

आपल्याच वाळूसाठी मोजावे लागणार पैसे

0
36

नागपूर :- राज्य शासनाकडून अनेक धोरणे तयार करण्यात येत आहेत. अनेक सुधारणांच्या नावाखाली अनेक कायदेही बदलण्यात येत आहेत. यातील काही नवीन धोरणांचा राज्य शासनाला फटका बसत असल्याचे दिसते. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार आला. त्यामुळे महसूल वाढीवर त्यांचा भर आहे. त्यासाठी ना तोटा ना फायदा तत्त्वावरील वाळू धोरणात बदल केला व पुन्हा जुनेच लिलावाचे धोरण अवलंबिले. यामुळे शासनाच्या तिजोरीत पैसा आला. परंतु त्याचा फटकाही त्यांना बसणार असल्याचे बोलल्या जात आहे. कारण शासकीय कामासाठी शासनालासुद्धा वाळूकरिता पैसे मोजावे लागणार आहे.