Home Latest News विदेशातून आणले अग्निशमन बंब, ‘आरटीओ’त अडकले

विदेशातून आणले अग्निशमन बंब, ‘आरटीओ’त अडकले

0
42

नागपूर :- महापालिकेने अग्निशमन सेवा बळकट करण्यासाठी विदेशातून दोन महिन्यापूर्वी अत्याधुनिक यंत्रणा असलेले अग्निशमन बंब आणले. जहाजमार्गाने चार महिन्यांच्या प्रवासानंतर हे अग्निशमन बंब नागपुरात दाखल झाले. परंतु या अग्निशमन बंबाची वैशिष्ट्ये बघता परवानगीसाठी दोन महिन्यापासून नागपूर शहर आरटीओ कार्यालयात अडकले आहे. मागील काही वर्षांमध्ये शहरामध्ये ७० मीटर उंचीपर्यंतच्या इमारती बांधकामाला मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आली. उंच इमारती वाढत असल्याने महापालिकेने ७० मीटर उंचीपर्यंत लागलेली आग नियंत्रणात आणण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक हँड्रोलिक प्लॅटफॉर्म मशीन (अग्निशमन बंब) फिनलॅण्ड येथून खरेदी केले. नोव्हेंबर महिन्यात हे अग्निशमन बंब नागपुरात दाखल झाले. नियमानुसार परवानगीसाठी प्रादेशिक वाहतूक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) महापालिकेने पाठवले. परंतु, दोन महिन्यांपासून नवीन अग्निशमन बंब ‘आरटीओ’त अडकले असल्याने अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणाला धक्का बसला आहे.