Home Latest News विदेशातून आणले अग्निशमन बंब, ‘आरटीओ’त अडकले

विदेशातून आणले अग्निशमन बंब, ‘आरटीओ’त अडकले

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महापालिकेने अग्निशमन सेवा बळकट करण्यासाठी विदेशातून दोन महिन्यापूर्वी अत्याधुनिक यंत्रणा असलेले अग्निशमन बंब आणले&period; जहाजमार्गाने चार महिन्यांच्या प्रवासानंतर हे अग्निशमन बंब नागपुरात दाखल झाले&period; परंतु या अग्निशमन बंबाची वैशिष्ट्ये बघता परवानगीसाठी दोन महिन्यापासून नागपूर शहर आरटीओ कार्यालयात अडकले आहे&period; मागील काही वर्षांमध्ये शहरामध्ये ७० मीटर उंचीपर्यंतच्या इमारती बांधकामाला मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आली&period; उंच इमारती वाढत असल्याने महापालिकेने ७० मीटर उंचीपर्यंत लागलेली आग नियंत्रणात आणण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक हँड्रोलिक प्लॅटफॉर्म मशीन &lpar;अग्निशमन बंब&rpar; फिनलॅण्ड येथून खरेदी केले&period; नोव्हेंबर महिन्यात हे अग्निशमन बंब नागपुरात दाखल झाले&period; नियमानुसार परवानगीसाठी प्रादेशिक वाहतूक परिवहन कार्यालयाकडे &lpar;आरटीओ&rpar; महापालिकेने पाठवले&period; परंतु&comma; दोन महिन्यांपासून नवीन अग्निशमन बंब &OpenCurlyQuote;आरटीओ’त अडकले असल्याने अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणाला धक्का बसला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version