spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नंदनवन पोलिसांची यशस्वी कारवाई: घरफोडी व वाहनचोरी प्रकरणातील आरोपी अटकेत; ४.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

नागपूर, १८  – नंदनवन पोलिसांनी एका घरफोडी आणि वाहनचोरी प्रकरणातील आरोपीला अटक करत एकूण ४,५५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना २ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजल्यापासून ते ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत दरम्यान घडली.

फिर्यादी अक्षय अंबादे (वय ३४, रा. गोपालकृष्ण नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे सासरे  बाबूराव खोब्रागडे (वय ६२) हे मुंबई येथे पत्नीसह गेले असताना, त्यांच्या विद्यानगर, वाठोडा लेआउट येथील बंद घराचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून १.५० लाख रुपये रोख आणि विविध सोन्याचे दागिने असा एकूण ८.६५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान नंदनवन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अफरोज समशाद अन्सारी (वय २३, रा. अंबेनगर, पारडी, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील सखोल चौकशीत त्याने नागपूर शहरातील इतर दोन ठिकाणी घरफोडी आणि सक्करदरा परिसरात वाहन चोरी केल्याचे उघड केले. पोलिसांनी आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने, सोन्याची लगड आणि हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. MP28-MQ-7584) असा एकूण ४,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त शिवाजीराव राठोड (दक्षिण प्रभाग), पोलीस उपआयुक्त रश्मीता राव (परिमंडळ ४), तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे (सक्करदरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक विनायक कोळी, उपनिरीक्षक प्रदीप काईट, पो.ह.वा. आशिष तितरमारे, नापो. अं. संजय वरवाडे, प्रदीप भदाडे, सोमेश्वर घुघल आणि संजय मुकादम यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला.
पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles