नागपूर :- श्रमिक पत्रकार संघ तथा टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनी छायाचित्रकार संगीता महाजन यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. नंतर लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्याला मनीष सोनी यांच्या हस्ते, तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्याला ट्रस्ट चे उपाध्यक्ष प्रभाकर दुपारे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, सरचिटणीस अनुपम सोनी, ट्रस्टचे सरचिटणीस शिरीष बोरकर, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, गणेश शिरोळे, भूपेंद्र गणवीर, श्यामकांत पात्रीकर, विनय करंदीकर, चंद्रकांत अणेकर, सुनील तिवारी, चंद्रशेखर जोशी, महेश उपदेव, विवेक पुराडभट, महेंद्र आकांत, सनी शेन्डे, अनंत मुळे, हितेश लिंबाचिया, नरेश डोंगरे, किरण राजदेरकर, आनंद मोहरील, आशिष जोशी आदी उपस्थित होते.








