नागपुर १८ : दिनांक १६/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक १७/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये विजय माहुलकर पोलीस उप अधिक्षक (गृह), नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच नागपुर उपविभागातील पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत बुटीबोरी टाउन आणि सातगाव येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले आणि एमआयडीसी चौक येथे नाकाबंदी करण्यात आली. पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी अंतर्गत गंगापुर झोपडपट्टी येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले आणि गार्डन चौक येथे नाकाबंदी करण्यात आली. कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. सदर कोबिंग ऑपरेशन विजय माहुलकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. सदर कारवाईत स्थानिक पोलीस स्टेशन येथील अधिकारी अंमलदार आणि दंगा नियत्रंण पथक चे पोलीस अंमलदार हजर होते नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासाणी करण्यात आली.
रात्र गस्त दरम्यान कोबींग ऑपरेशन राबवुन केले रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक आणि नाकाबंदी करून तपासली वाहने









