– जागृतीचे भजन आणि गोपाल काल्याचे किर्तन सह विविध कार्यक्रमाचे आयोजन.
कन्हान :- न्यु गोंडेगाव येथील रहिवासी मारोतराव लसुंते यांचा निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा समर्थ सद्गुरु संत भाकरे बाबा यांची १०५ वी जयंती दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुवार (दि.२९) जानेवारी रोजी सकाळी विधि वत पूजा अर्चना करुन कलशाची स्थापना करण्यात आली. सायंकाळी दिपोत्सव, हरिपाठ आणि जागृती चे भजन करण्यात आले. शुक्रवार (दि.३०) ला सकाळी ह.भ.प. विलास बनवाईत महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन करण्यात आले आणि महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता कर ण्यात आली. कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांचे विलास लसुंते, सरिता लसुंते यांचा सह लसुंते परिवा रांनी आभार मानले.








