spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प – जयदीप कवाडे

नागपूर :- केंद्र सरकारने संसदेत सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दीर्घकालीन संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा असून, देशाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचा मार्ग स्पष्ट करणारा आहे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयदीप कवाडे म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची विकासदृष्टी अधोरेखित करणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, लघु व मध्यम उद्योग आणि रोजगारनिर्मिती यांना दिलेले प्राधान्य देशाच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन स्थैर्य देणारे ठरेल.

ते पुढे म्हणाले की, लघु व मध्यम उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचे खरे बळ आहेत. या क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या वित्तपुरवठा, कर्जसुलभीकरण आणि प्रोत्साहनपर योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. महाराष्ट्रासारख्या औद्योगिकदृष्ट्या अग्रगण्य राज्याला याचा विशेष लाभ होणार आहे. शेती व ग्रामीण विकासाबाबत बोलताना कवाडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा पंतप्रधान मोदी सरकारचा मूलभूत संकल्प आहे. कृषी पायाभूत सुविधा, प्रक्रिया उद्योग, साठवण व्यवस्था आणि बाजारपेठेच्या बळकटीकरणावर दिलेला भर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच कौशल्य विकास, नवउद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर केंद्रित केलेल्या योजना देशातील तरुणांना रोजगारक्षम बनवतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील गुंतवणूक भारताला जागतिक स्तरावर सक्षम बनवेल. मध्यमवर्गीयांच्या अपेक्षांबाबत जयदीप कवाडे म्हणाले की, महागाईच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गाला काही प्रमाणात अधिक दिलास्याची अपेक्षा होती; मात्र आर्थिक शिस्त राखत देशाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून सादर झालेला हा अर्थसंकल्प सामाजिक न्याय, आर्थिक विकास आणि राष्ट्रीय प्रगती यांचा समतोल साधणारा आहे. विकसित, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताच्या दिशेने टाकलेले हे ठोस पाऊल आहे, असा विश्वास जयदीप कवाडे यांनी व्यक्त केला.

Popular Articles