spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मालमत्ता कर थकबाकीदारांना मोठी सवलत

– शास्तीमध्ये ७५ टक्केपर्यंत सूट जाहीर

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीसाठी थकबाकीदार मालमत्ता धारकांना शास्ती रक्कमेत अंशतः सूट देण्यात येणार आहे. ही सवलत योजना १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

पालिकेच्या उत्पन्नात वाढ करून मालमत्ता कराची नियमित वसुली आवश्यक असल्याने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तांना शास्तीमध्ये सूट देण्याचे अधिकार आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०२५ पर्यंत १० टक्के आणि डिसेंबर २०२५ पर्यंतच्या मुदतीत ५ टक्के सवलत देण्यात आली होती. परंतु, अपेक्षित वसुली झाली नसल्याने आता मार्च २०२६ अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही नवीन सवलत योजना राबवली जात आहे.

१ फेब्रुवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण कर ऑनलाइन भरल्यास शास्तीमध्ये ७५ टक्के सूट, ऑफलाइन भरल्यास शास्तीमध्ये ७० टक्के सूट, १६ फेब्रुवारी २०२६ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण कर ऑनलाइन भरल्यास शास्तीमध्ये ५० टक्के सूट, ऑफलाइन भरल्यास शास्तीमध्ये ४५ टक्के सूट आणि १६ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण कर ऑनलाइन भरल्यास शास्तीमध्ये २५ टक्के सूट, ऑफलाइन भरल्यास शास्तीमध्ये २० टक्के सूट देण्यात येणार आहे.

पालिकेने नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यास प्रोत्साहन दिले आहे. कारण त्यात जास्त सूट मिळणार आहे. थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेऊन एकमुस्त कर भरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.