भूकरमापक संवर्गाचा निकाल जाहीर

0
64

नागपूर :- उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालय नागपूर विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १३ व १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल ३० जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला असून या संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in उपलब्ध असल्याचे सदस्य सचिव, गट क निवड समिती तथा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख नागपूर प्रदेश, नागपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.