spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रेल्वे गाड्यांचे सतत आवागमन सुरू असल्याने अर्धा तास निमखेडा फाटक बंद राहिल्यानंतर पुन्हा दहा मिनिटे रेल्वे इंजिन बदलण्याचे काम फाटक बंद ठेवूनच केल्याने वाहनधारक झाले कमालीचे त्रस्त, फाटका जवळच रेल्वे इंजिन बदलण्याचे काम बंद करण्याची त्रस्त वाहनधारकांची मागणी

किशोर साहू, मौदा, ता. ४ :-  मंगळवार दिनांक 3 फरवरी ला सकाळी साडेआठ ते सव्वा नऊ दरम्यान सतत 40 मिनिटे निमखेडा रेल्वे फाटक सतत बंद राहिल्याने रेल्वे फाटक च्या दोन्ही बाजूला शेकडो गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्याने, रेल्वेच्या तीन पटऱ्यांवर सहा ते सात रेल्वे गाड्यांचे सतत आवागमन झाल्याने अर्धा तास निमखेडा फाटक बंद राहिल्यानंतर त्यातच पुन्हा दहा मिनिटे रेल्वे इंजिन बदलण्याचे काम (फाटक गेट मॅन कोमल सोनवणे यांनी सांगितल्यानुसार) फाटक बंद ठेवूनच केल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले. यानंतर रेल्वे इंजिन बदलण्याचे काम रेल्वे फाटकाजवळ करू नये अशी मागणी आजच्या कमालीचे त्रस्त वाहनधारकांनी वैतागून सकाळचे निमखेडा रेल्वे फाटक वरचे गेट मॅन कोमल सोनवणे व गेट लॉक व ओपन करण्याचे काम करणारे स्टेशन मास्तर देशभ्रतार यांच्याकडे केली आहे. तसेच शेवटच्या टप्प्यावर आलेले रेल्वे ओवरबीजचे कामही तातडीने पूर्ण करण्याची मागणी नेहमीच निमखेडा फाटक बंद अभावी वेळेच्या अपव्यय होणाऱ्या त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.

Popular Articles