– नवनियुक्त लोकप्रतिनिधी आणि धार्मिक यात्रा पूर्ण करणाऱ्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जामा मस्जिद व सौदागर मोहल्ला मस्जिद ट्रस्ट भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने वतीने ट्रस्ट कार्यालयात सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जनाब अतहर परवेज पटेल होते. त्यावेळी ट्रस्टचे सचिव जनाब अ. रशीद (निसार) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष जनाब अतहर परवेज पटेल, सचिव जनाब अ. रशीद (निसार), उपाध्यक्ष जनाब मो. मुश्ताक (बल्लि), सहसचिव जनाब हाफीज इमरान अली, सदस्य जनाब सैय्यद शकील, जनाब अनिसउद्दीन खान, जनाब हाफीज मोहसीन काझी, जनाब मन्शाउर्रहमान खान, जनाब इकरामुरहीम खान, जनाब एजाज बेग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भंडारा नगर परिषदेचे नवनियुक्त नगर सेवक हाजी मोहम्मद मुस्ताक (बल्लि भाई) तसेच हुजूर पाक यांचा रोजा-ए-अक़्दसची पाहणी व उमरा अदा करून परत आलेले अशरफ भाई यांचे शाल, गुलदस्ता देऊन स्वागत व अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर नवाज यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सफीक अहमद खान यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जामा मस्जिद व सौदागर मोहल्ला मस्जिद ट्रस्ट भंडारा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.








