spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाडक्या लोकनेत्याला भंडारावासीयांचा साश्रू नयनांनी निरोप; स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे वैनगंगेत विसर्जन

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय जननेते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी भंडारा शहरात आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या या अस्थिकलशाचे असंख्य नागरिकांनी साश्रू नयनांनी दर्शन घेऊन आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

बारामतीहून आणलेला हा अस्थिकलश सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि महिलांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाने भजनांतून आदरांजली वाहिली. अजितदादांनी भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी, विशेषतः गोसे प्रकल्प, सुरेवाडा, सोंड्याटोला, नेरला आणि करचखेडा उपसा सिंचन प्रकल्पांना दिलेल्या भरीव निधीच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

याप्रसंगी माजी मंत्री नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, धनंजय दलाल, सुनील फुंडे, सरिता मदनकर, जिया पटेल, नरेश डहारे, आशु गोंडाणे, गोपाल मांडवकर, अनिल गायधने, जयश्री बोरकर, देवचंद ठाकरे, शैलेश मयूर, प्रकाश मालगावे, अनिल सार्वे, कल्पना कुझेकर, अमृत बन्सोड, होमराज कापगते, धनपाल चौधरी, सुरेश धुर्वे, प्रीती जगनाडे, मधु चौधरी, महादेव मेश्राम, प्रकाश पचारे, राजू माटे, हेमंत महाकाळकर यांसह अनेक मान्यवरांनी दादांच्या कार्याचा गौरव करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

दुपारी ३ वाजता कार्यालयापासून अस्थिकलशाची अंत्ययात्रा निघाली. भजन मंडळींच्या स्वरात महाल मार्ग, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक मार्गे हा कलश वैनगंगा नदीच्या जुन्या पुलाजवळील घाटावर नेण्यात आला. तेथे विधिवत पूजा करून अत्यंत शोकाकुल वातावरणात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी “अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

Popular Articles