कामठी :- समाजात अनेक सणोत्सव साजरे केले जातात त्याचाच एक सण म्हणजे शब-ए-बारात. शब-ए -बारात म्हणजे पूर्वजांचे स्मरण .या रात्री मुस्लिम बांधव आपल्या चुकांची कबुली अल्लाहकडे देतात आणि भविष्यातील सुख,शांती यश ,समृध्दी यासाठी प्रार्थना करतात.शिय्या आणि सुन्नी अशा दोन पंथातील समाज बांधव शब-ए-बारात ची रात्र साजरी करतात.
सर्वसाधारण बोली भाषेत याला शब ए बारात असे म्हटले जात असले तरी वास्तविकपणे शब-ए-बराअत असे म्हटले जाते.आज 3 फेब्रुवारी ला कामठी तालुक्यात शब ए बारात पर्व साजरा करण्यात आला.मुस्लिम समाजातील चार पवित्र रात्रीपैकी शब ए बारात ही सुद्धा एक पवित्र रात्र असल्याची मान्यता आहे.आशुरा ची रात, शब ए मेराज, शब ए कद्र, शब ए बारात अशा चार पवित्र रात्री आहेत.इस्लाममध्ये या रात्रीला अनन्यसाधारण महत्व असते.शब ए बारातच्या रात्री करण्यात येणारी प्रार्थना आणि योग्य मागणी अल्लाह नक्कीच पूर्ण करतो.या रात्री मुस्लिम बांधवावर अल्लाह कृपा करतो, अशी मान्यता आहे.या रात्री वर्षभर केलेल्या गुन्ह्याची कबुली अल्लाहकडे दिली जाते. आणि केलेल्या चुकांची माफी मागितली जाते.या दिवशी मुस्लिम बांधवांच्या चुकांचा हिशोब केला जातो आणि त्यांच्या नशिबाचा निर्णय होतो.असे सांगितले जाते.शब ए बारात च्या रात्री मुस्लिम बांधव केवळ आपल्या गुन्ह्यांची कबुली देत नाहीत तर आपल्या पूर्वजांचे स्मरणही करतात. यासाठी येथिल मुस्लिम समाजबांधवांनी कामठीच्या मुस्लिम कब्रस्तानात जाऊन पूर्वजांना स्मरण केले.
या शब ए बारात पर्वानिमित्त मुस्लिम कब्रस्तान कमिटी च्या वतीने मुस्लिम कब्रस्तान येथे विद्दूत व्यवस्था,साफ सफाई तसेच वाहतूक पार्किंग सह पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती..उपस्थित मुस्लिम समाजबांधवांनी शांतपूर्वक पद्धतीने अल्लाहकडे विनवणी करीत पूर्वजाना स्मरण करून भाईचारा चा संदेश दिला.








