spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाघाची शिकार : तब्बल ०३ वर्षांनंतर शिकाऱ्याला शिक्षा…!

– ६ आरोपींना ३ वर्षांचा सश्रम कारावास

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- पेंच व्याघ्रप्रकल्पाततील पवनी वनपरिक्षेत्रात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार केल्याच्या गंभीर प्रकरणी नागपूर (रामटेक) न्यायालयाने ३० जानेवारी २०२६ रोजी ६ आरोपींना ३ वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात वाघाच्या कातडीची आणि हाडांची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रामटेकचे जेएमएफसी व्ही.सी. वोराणी यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. यामध्ये ५ आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व १५,००० रुपये दंड तशीच अन्य शिक्षा सुनाविण्यात आल्या. ही घटना १२ जानेवारी २०२३ रोजी घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन क्षेत्रसंचालक ए. लक्ष्मी व डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे आणि सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांनी पूर्ण केला होता. सर्व पुरावे व कागदपत्रांसह विहित कालावधीत न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठराविक मुदतीत हा खटला चालविण्यात आला. न्यायालयीन पाठपुराव्याचे कार्य उपसंचालक (पेंच व्याघ्र प्रकल्प) अक्षय गजभिये व सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिमगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोमेश ठाकरे यांनी न्यायालयीन पाठपुरावा केला. वनविभागाच्या वतीने मनीषा राऊत, मोहन भांडेकर आणि ए. के. रानवरे यांनी न्यायालयात ठामपणे मांडली. पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने या निर्णयाचे स्वागत करत, हा निकाल वन्यजीव संरक्षणासाठी दिलासा देणारा असून भविष्यातील गुन्हेगारांसाठी कडक इशारा आहे.

प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे:

घटना: १२ जानेवारी २०२३ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी क्षेत्रात वाघाची शिकार

शिक्षा: ६ आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास

न्यायालय: जेएमएफसी रामटेक, व्ही.सी. वोराणी

तपास: वन विभागाने १० साक्षीदार आणि ११३ कागदपत्रांच्या आधारे हा खटला सिद्ध केला.

Popular Articles