spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक

रामटेक :- रामटेक पोलीस स्टेशन यांनी गुप्त बातमीदाराच्या माहीतीवरून तुमसर रामटेक रोड, महादुला शिवार, रामटेक येथे फिस्टा फोर्ड कार कमांक एम एच ०२/ए.यु-३५९१ हे वाहन अवैधरित्या ०५ गोवंश जनावरे (गाई) या जनावरांची वाहतुक करतांना पकडुन ५ जनावरांची सुटका करण्यात आली होती. नमुद गुन्हयातील आरोपी हे वाहन सोडुन पळुन गेले होते. सदर प्रकरणी आरोपीतांविरूध्द कलम ११(१) (ड) (ई), (एफ) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, सहकलम ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम २८१ भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आज दिनांक ०४/०२/२०२६ रोजी रामटेक पोलीसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या माहीतीवरून पाहीजे नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी वाहन मालक आरोपी नामे १) जमशेर खान मुनिर खान पटेल, वय २१ वर्ष, रा. जुनी खलासी लाईन, कामठी, नागपूर याला कामठी परीसरातुन ताब्यात घेतले असुन आरोपीला अटक केली आहे. रामटेक पोलीस साखळी पुरावे जोडुन पुढील तपास करीत आहे.

Popular Articles