हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जन्म-मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी हे दोन्ही विषय नागरिकांच्या जीवनातील महत्वाचा घटक असून याबाबत सर्व नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. या करीता नागरिकांना आवश्यक असलेली माहिती आरोग्य सल्ला केंद्र (HACC) कक्षामार्फत याविषयी आवश्यक माहिती देण्यात येत आहे.
जन्म-मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी हे दोन्ही विषयीचे नियम-अधिनियम, कार्यपद्धती व घ्यावयाची दक्षता याबाबत आवश्यक असलेली माहिती आरोग्य सल्ला केंद्र(HACC),१०४ या हेल्पलाईन नंबर वर संपर्क केले असता नागरीकांना माहिती देण्यात येत आहे.
या माहितीमध्ये जन्म-मृत्यु नोंदणी बाबत मार्गदर्शन, नोंदणी कोण करु शकतो, नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे, निबंधकाकडे नोंदणी करण्याची कालमर्यादा, नागरीकांना प्रमाणपत्र मिळण्याचे कालावधी व जन्म –मृत्यु नियम, अधिनियम तसेच विवाह नोंदणी अधिनियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन व कायदेविषयक सल्ला मदत केंद्र संपर्क क्रमांक 104 वर दिला जात आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर यांनी केले आहे.



