spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोफत चष्मे वितरण व नेत्र तपासणी, खापा येथे शिबिरास प्रतिसाद; ४२४ जणांची केली नेत्र तपासणी

खापा, वार्ताहर :- संत पतीराम महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त श्री मुरलीधर देवस्थान ट्रस्टच्यावतीने हलबा समाज महासंघ सांस्कृतिक भवन व महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय, नागपूर यांच्यातर्फे ६ फेब्रुवारी शुक्रवारला सकाळी दहा वाजता बुवाची वाडी येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर व चष्मा वाटपच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात एकूण ४२४ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. या शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री मुरलीधर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिवाकर बोंदरे, उपाध्यक्ष अनिल हिंगे, सचिव सुधाकर गुजर, कोषाध्यक्ष प्रकाश ठोंबरे, सदस्य रोशन पलांदुरकर, आशिष कुंभारे, रमेश लष्करे, भोजराज खंते, बाबुभाई पटेल, राजू चौरासे, चंदाबाई रामावत, व्यवस्थापक दिवाकर ढोले यांनी अथक परिश्रम घेतले.

नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून, संत पतीराम महाराज यांच्या समाधीचे पूजन करून करण्यात आले. या वेळी महात्मे नेत्रपेढीचे अध्यक्ष डॉ. देवराव नंदनवार, कार्याध्यक्ष विश्वनाथ धकाते, उपाध्यक्ष अशोक निमजे, वामनराव खापेकर, सदस्य चंद्रकांत वैद्य यांच्यासह संस्थेचे आदी पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

शिबिरात एकूण ४२४ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४६ जणांना नगराध्यक्ष पियुष बुरडे यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप केले. काहींना आवश्यकतेनुसार डोळ्याचे ड्रॉप देण्यात आले. ३५ जणांना मोतीयाबिंदू निघाला, तर त्यांना पुढील काही दिवसात महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय, नागपूर यांच्या मार्फत शल्यक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिलांची संख्या अधिक होती. महात्मे नेत्रपेढीच्या चमूने शिबिर यशस्वी केले. शिबिरातील उपस्थित नागरिकांना महात्मे नेत्रपेढीच्या डॉक्टरांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

Popular Articles