spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात; २१५ पदांसाठी २०,६८३ अर्ज

चंद्रपूर :- चंद्रपूर पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर काल 11 तारखे पासून पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेत प्रथम उमेदवारांचे शारीरिक मोजमाप, त्यानंतर मैदानी चाचण्या आणि पुढील टप्प्यात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त २१५ पदांसाठी राज्यभरातून एकूण २० हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये १४ हजार ६०७ पुरुष, ६ हजार ७४ महिला आणि २ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक मोजमाप व मैदानी चाचण्यांसाठी सखोल नियोजन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेसाठी १ पोलिस अधीक्षक, ४ पोलिस उपअधीक्षक, १८ पोलिस निरीक्षक, ४६ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ३३५ महिला व पुरुष पोलिस अंमलदार, १० पोलिस कवायत निदेशक तसेच ३२ व्हिडिओग्राफर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय २७ मंत्रालयीन लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, एकूण ६८ पोलिस अधिकारी व ३९१ पोलिस अंमलदार या प्रक्रियेत सहभागी आहेत.भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून, मैदानी चाचण्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. १०० मीटर, ८०० मीटर आणि १६०० मीटर धावण्याच्या चाचण्यांसाठी आरएफआयडी (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उंची मोजमापासाठी लेझर पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.

संपूर्ण भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही व व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे सतत लक्ष ठेवण्यात येणार असून, कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

Popular Articles