spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाबांनी दिलेली शिकवण आचरणात आणा

– निसतखेडा येथे भव्य रथ यात्रा व परमात्मा एक सेवक संमेलनात मान्यवरांचे आव्हान

किशोर साहू, मौदा, तारीख १३ :- महानत्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेली शिकवण चार तत्त्व, तीन शब्द, पाच नियमाच्या दिलेल्या शिकवणीने चाला. जीवनाचा उद्धार करा. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती बाबाच्या शिकवणीच्या माध्यमातून झाली. हजारो दुःखी कुटुंब सुखी आहेत. मागचे जुने दिवस आठवा, तो दिवस कसा होता, आज मी कसा आहो, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, शिकवण आचरणात आणा, मन शुद्ध ठेवा, आपल्या जीवनाची प्रगती करा असे आव्हान निसतखेडा येथील बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ येथे सेवक संमेलनात उपस्थित मान्यवरांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, बाबांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रम स्थळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री सुनिल केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी पदाधिकारी अवंतिका लेकुरवाळे, देवेंद्र गोडबोले, रमेश कारेमोरे, प्रकाश महादूले, सरपंच प्रज्ञा राहुल बावने, संकेत झाडे, प्रमोद बरबटे, मदन बरबटे, कुंजीलाल बरबटे, राहुल बावणे, आशीष चव्हान, जयराम महाजन, भोजराज भैरम, मनोहर महादुले, बंडू वाणी सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह बाबांचे मार्गदर्शक व सेवक, सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.