spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने तीन दिवसीय छत्रपती शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

नागपूर :- मराठा विद्या प्रसारक समाज नागपूर तर्फे १७ ते १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहाचे प्रांगण, सक्करदरा चौक, येथे मंगळवारी १७ फेब्रुवारीला सायंकाळी. ६ वा. तुषार सूर्यवंशी (सप्त- खंजरीवादक) यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रम बुधवारी १८ फेब्रुवारीला सायंकाळी. ५ वाजता. ढोल ताशा पथक सादरीकरण, सायंकाळी ६ वाजता पुष्पक लोहीतकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, गुरुवार दि. १९ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता भव्य स्कूटर रेली, सायंकाळी. ५ वा. ताजराज हिरा आखाडा यांचे शिवकालीन क्रिडा प्रात्यक्षिक, सायंकाळी. ६ वाजता गौरी शिंदे यांचा शिवसंध्या सांकृतिक कार्यक्रम शिव जन्मोत्सवानिमित्त आयोजित उपरोक्त सर्व कार्यक्रमांना समस्त शिव भक्त नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आयोजक मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर यांनी सांगितले.

Popular Articles