spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रधान मंत्री सडक योजनेत बनविलेल्या रोडाची एका वर्षातच वाट लागली

यासीन शेख गोंदिया :- सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम चीचटोला धानोरी लेंडेझरी या 5 किमी वर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था गोंदिया यांच्या मार्फत सण 2024-2025 मध्ये या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते पण सदर बांधकाम आल्या अवधीत उसवडलेले असून ठीक ठिकाणी जीव घेण्याच्या जागे खड्डे पडले आहेत त्यामुळे दुचाकी या वाहनांना कसरत करावी लागते अनेकांचे तर अपघात सुद्धा झाले आहेत लेंडेजरी धानोरी कोसमतोंडी वरून लांब पडत आहे व धानोरी वरून सरळ मार्गाने चीचटोला इथून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्ता तयार होत असतानाही रस्ता बांधकामाच्या निकृष्ट दर्जाची काम होत असताना येथील गावकऱ्यांनी काम थांबविले होते पण कंत्राट दराने रात्री 12 च्या वेळेस काम आटपवून धानोरी पर्यंत शिलकोर केले रोडाचे काम निकृष्ट होत आहे ते दाखवण्यासाठी जि प सदस्य रांग डाले सुद्धा ताई यांनी इंजिनीयर पटले यांना मोक्या वर बोलावून रोडाचे निकृष्ट बांधकाम होत असल्याचे निर्देक्षणात आणून दिले तरी कंत्राट दराने तसेच काम 5 की मी पर्यंत पूर्ण केले तसेच धानोरी ते चीचटोला दरम्यान रोडाची रुंदी सुद्धा कमी केले व रोडच्या दोन्ही कडेला मुरूम न भरल्याने चार चाकी वाहन क्रॉस होऊ शकत नाही शेतकऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी जागा दिली तर नाहीच पण रोडावर खडकलेले रोडावर गाडलेले सीमांकन सिमेंट दगड अनेक शेतकऱ्यांनी गहाळ केले त्यामुळे रोड निरुंद झाले व आज तेच नागरिक रोड अरुंद बनवलेले म्हणून बोंबा मारत आहेत कंत्राट दराने शिडी वर्कमध्ये रोडावर येणाऱ्या नाल्या मोडीचे बांधकाम केले नसल्याने नाली लगत असलेल्या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते.

– फाईल फोटो

Popular Articles