spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगराध्यक्षा संजना मंगळे यांचे ठाम नेतृत्व; सावनेरमध्ये कचरा डेपो हटविण्याची ऐतिहासिक वचनपूर्ती!”

– कचरा डेपो हटविण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

सावनेर :- नगर परिषद सावनेरच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेला शब्द आज प्रत्यक्षात उतरला आहे. आपल्या सावनेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. आशीषराव देशमुख तसेच नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे यांच्या पुढाकाराने नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विद्यमान कचरा डेपो हटविण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. शहराच्या स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या ठाम भूमिकेमुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला. लवकरच सावनेर शहर हद्दीबाहेरील ठिकाणी नवीन कचरा डेपो उभारण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. आधुनिक व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून हे केंद्र विकसित केले जाणार असून कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व सुरक्षित पद्धतीने केले जाईल. “आपला विश्वास, आमची जबाबदारी” या भूमिकेतून शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्यासाठी आमचा निर्धार कायम आहे. तसेच स्वच्छ आणि प्रगत सावनेर घडविण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे मत संजना मंदार मंगळे यांनी व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.