spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुक्ताई प्री स्कूल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण, ॲबॅकसचा मोठ्या संख्येने लाभ घ्या – नगराध्यक्ष पियुष बुरडे

खापा, वार्ताहर :- मुक्ताई ॲबॅकस वर्ल्ड तर्फे मुक्ताई प्री स्कूल, माताखेडी, येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त (दि. २२ फेब्रुवारी) रविवारला चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेमध्ये खापा शहरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. वर्ग १ ते ४ ‘अ’ गट, वर्ग ५ ते ७ गट ‘ब’ व वर्ग ८ ते १० गट ‘क’ अश्या तीन गटात चित्रकला स्पर्धा पार पाडली.

गट ‘अ’ मध्ये लावण्या धार्मिक प्रथम, जिविका तायवाडे द्वितीय आणि हीरेन तायवाडे ने तृतीय पारितोषिक मिळविले. गट ‘ब’ मध्ये वंश तायवाडे प्रथम, निधिष कुंभारे द्वितीय आणि युग कुंभारे याने तृतीय पारितोषिक मिळवले. गट ‘क’ मध्ये सृष्टी बारापात्रे हिने प्रथम आणि यामिनी पडोळे हिने द्वितीय पारितोषिक मिळवले.

यावेळी मुक्ताई ॲबॅकस वर्ल्ड द्वारा संचालित मुक्ताई प्री स्कूलमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा बक्षीस वितरण करण्यात आले. ज्यामध्ये सक्षम हटवार प्रथम, जय पराते द्वितीय, नैतिक लांजेवार तृतीय, किंजल बांगडे चतुर्थ आणि रुद्रांशी वारोतकर हिने पाचवा क्रमांक पटकावला.

गुणवंत विद्यार्थ्यांना न. प. खापा नगराध्यक्ष पीयुष बुरडे, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, नगरसेवक निखिल आष्टनकर, गटनेता रवि परतेकी, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश तालपल्लीवार, मनोज धानोरे, लॉयर महेश गभने व माजी सैनिक तथा मॉयल सुरक्षा निरीक्षक दिलीप गभने यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .

मुक्ताई प्री स्कूल तर्फे ॲबॅकस, चित्रकला, नृत्य, कॅलिग्राफी, फोनिक्स इत्यादी क्लासेस खापा शहरात सुरू केल्याबद्दल नगराध्यक्ष पीयुष बुरडे यांनी कौतुक केले आणि खापा शहरातील पालकांनी मोठ्या संख्येने आपल्या मुलांना याचा लाभ देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन मुक्ताई ॲबॅकस वर्ल्डच्या संस्थापिका व संचालिका हिना मिथुन चलाख यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार मार्गदर्शक नलिनी गभने यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.