spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान येथे अखिल कुणबी समाज मेळावा थाटात संपन्न

– मान्यवर, लोकप्रतिनिधी, जेष्ट नागरिक सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार                   

कन्हान :- जगतगुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय व संत गाडगे बाबा यांच्या सयुक्त जयंती उत्सव मराठा सेवा संघ कन्हान व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून अखिल कुणबी समाज स्नेह मेळावा थाटात संपन्न करण्यात आला.

शनिवार (दि.२१) फेब्रुवारी २०२६ ला सायं. ४ वाजता डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची (दि.२) फेब्रुवारी ला ४१८ वी जयंती, महाराष्टाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची (दि.१९) फेब्रुवारी ला ३९६ वी जयंती आणि संत गाडगेबाबा यांची (दि.२३) फेब्रुवारी ला १५० वी जयंतीचे औचित्य साधुन मराठा सेवा संघ कन्हान व्दारे या महापुरूषांची सयुक्त जयंती अखिल कुणबी समाज स्नेह मेळाव्याचे शिवश्री प्रभाकर महाजन माजी अध्यक्ष मराठा सेवा संघ कन्हान यांचे अध्यक्षेत व प्रमुख मार्गदर्शन शिवश्री आकाश टाले सप्त खंजरी वादक प्रखर शिव व्याख्याते नागपुर प्रमुख अतिथी- शिवश्री पवन बोंदरे शिव व्याख्याते दहेगाव जोशी, शिवश्री किशोर वानखेडे संचालक साईबाबा आश्रमशाळा टेकाडी, शिवश्री प्रशांत भोयर प्रथम अध्यक्ष मराठा सेवा संघ कन्हान, शिवमती माया इंगोले अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड कन्हान आदीच्या हस्ते बळीराजा, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अखिल कुणबी समाज स्नेह मेळाव्यास सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी नगरपरिषद कन्हा न-पिपरीचे स्विकृत नगरसेवक महेंद्र साबरे, नगरसेविका सनंदा दिवटे, नगरपंचायत कांद्री नगरसेवक दिेनेश खाडे, नगरसेविका रिता भगवान मस्के, वराडा सरपंच सुनिल जामदार, उपसरपंच वाघोली भोजराज काकडे, केरडी सरपंच पिंटु खंडार, बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे, नांदगाव पोलीस पाटील संतोष ठाकरे, किसान ब्रिगेड पारशिवनी तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे, सामाजिक युवा कार्यकर्ते प्रशांत मसार आणि जिजाऊ रथ यात्रेचे उत्तम स्वागतार्थ पवन बोंदरे दहेगाव जोशी, दिवाकर भोयर पारशिवनी, एकनाथ लांजेवार कामठी, रोशन जामदार वराडा तसेच जेष्ठ नागरिक प्रकाश नाईक, भरत साळवे, देविदास जामदार, ताराचंद निंबा ळकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून कुणबी समाजातील उपजाती विसरून सर्व साडे बारा जाती मध्ये रोटी, बेटी व्यव हार मोठया प्रमाणात सुर केल्यास समाजातील मुले, मुलींचे लग्नाची भिष्ण समस्या सुटुन कुणबी समाजा ची ओळख मजबुत होईल. असे किशोर वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करित समाज बांधवाना संबोधित केले. प्रमुख व्याख्याते आकाश टाले हयांनी महापुरूषांच्या विचारांची सुंदर माडणी करित संत तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे ” एकमेकां साहय करू, अवघे धरू सुपंथ” आपण आचरण करू तरच मराठा सेवा संघ, कुणबी समाज संघटित होऊन अधिक उन्न ती करण्यास उदाहरणासह अप्रतिम मार्गदर्शन केले. परिवारातील प्रमु़ख व्यक्तीनी आपला परिचय दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शांताराम जळते यांनी तर आभार मोतीराम रहाटे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वंसतराव इंगोले, राकेश घोडमारे, दिंगाबर हारगुडे, स्वप्निल मते, सोनु काळे, सुशिल ठाकरे, विठ्ठल मानकर, नामदेव नवघरे, ओम प्रकाश काकडे, प्रशांत डोईफोडे, संदीप भायदे, दिपक उघडे, योगराज अवसरे, भगवान कडु, मधुकर नागपुरे, बबनराव रायपुरे,औचितराव चौधरी, अरविंद अंबास्कर , अमृत नरूलेे, बब्रुवान घोडमारे, राधेशाम ठाकरे, विठ्ठल येलमुले, विजय चतुर, गोविंद जुनघरे, राजेश डाहाके, महेश मिसार, प्रकाश येलकर, गुंडेराव ठाकरे, गजानन वडे, देवराव गोतमारे, अशोक ठाकरे, देविदास चतुर, नानेश्वर काकडे, शंकर महल्ले, राजेश हुड, गणेश दिवटे, मनोज गुडधे, लता जळते, कमला गोतमारे, विमल वडे, चौधरी काकु, रंजना इंगोले, विजया काळे, रंजनी निंबाळकर, शोभा केणे, कुसुम हुड, विद्या रहाटे, वैशाली घोडमारे, कविता खैरकार सह समाज बांधवानी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.