spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिरसोली येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा शुभारंभ, जि प शाळा सिरसोली येथील माजी विद्यार्थी संघाचा स्तुत्य उपक्रम

किशोर साहू, मौदा :- गावात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरात गेल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे जि प शाळा सिरसोली येथील माजी विद्यार्थी संघाने वर्गणी गोळा करून फर्निचर व शैक्षणिक साहित्याची सोय केली, त्यांच्या या सामाजिक स्तुत्य उपक्रमाला गावातीलच सामाजिक कार्यकर्ते सुक्कल निमकर यांनी अभ्यासिकेसाठी स्वतःच्या राहत्या घरी मोफत सुसज्जित जागा उपलब्ध करून दिली. या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे माजी जि प सदस्य योगेश देशमुख यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातीलच सामाजिक कार्यकर्ते युवराज चाफले होते. देशमुख व चाफले दोघांनीही मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थी संघाच्या या स्तुत्य उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मुख्याध्यापिका उके, माजी सरपंच रामदास मते, पोलीस पाटील पायल निमकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांगदेव देशमुख, उपाध्यक्ष शालू तुमसरे , सचिव रेहपाडे,अंगणवाडी सेविका सुनिता निमकर ,मदतनीस भुते, डॉ. नंदनवार, मोरेश्वर देशमुख, राहुल निमकर, संजय देशमुख, आशिष मालाधारी, कोमल मेहर ,देवचंद भुते, रामदास किरपान ,शाळेतील शिक्षकवृंद , विद्यार्थीगण , वाचकवर्ग ,ग्रामवासी उपस्थित होते.

Popular Articles