spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा तालुक्यातील गावागावातील शाळा व कॉन्व्हेंट मध्ये रंग बरसे व इतर होळीच्या प्रसिद्ध गाण्यांवर गुलालाची उधळण करत थिरकले शालेय विद्यार्थी 

किशोर साहू, मौदा :- सोमवार (ता.2 मार्च)ला होलिका दहन निमित्त तालुक्यातील बहुतांश शाळा व कॉन्व्हेंट सकाळच्या पाळीत भरविलेल्या होत्या. कॉन्व्हेंट सह जिल्हा परिषद शाळांमध्येही शासनाने मनोरंजनात्मक शिक्षण होण्यासाठी व जिल्हा परिषद शाळेच्या शाळेमध्ये विद्यार्थी आकर्षित होण्यासाठी संगीत संच उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या संगीत साहित्य संचाच्या आज होळीचे प्रसिद्ध रंग बरसे सारखे गाणे लावण्यात येऊन विद्यार्थी त्या गाण्यांवर रंग उधळत बेधुंद नाचत गावागावात वृत्तपत्र वितरित करीत असताना दिसले.

मौदा तालुक्याच्या सीमेवरील स्थित येसंबा येथील जि प प्राथमीक शाळेतील विद्यार्थी आराध्या इरपाते (इयत्ता-4), हर्षाली धूर्वे (4) , अनामिका पाटेकर (2), अवनी मेश्राम (3), अवनी टेंभरे (2) , सान्विता कारोंडे (1), अंजली मेश्राम (1), आस्था वाहने (3),वेदांत उईके(3), निहाल केळेकर (3), तुषार पाटेकर(4) यांच्यासोबत विचारपूस केली असता आज शाळेत शाळेच्या पुस्तकी अभ्यासाऐवजी , संगीताच्या बॉक्सवर गुलाल उधळत नाचल्याचे मोठ्या आनंदाने सांगत होते. शाळेबाबत विचारपूस केली असता पटसंख्या 28 असलेला या शाळेत जानेवारी महिन्यात एक शिक्षिका सेवानिवृत्त झाल्याने व त्यांच्या ऐवजी दुसरी शिक्षिकेची अजूनही नेमणूक न झाल्याने फक्त एकच शिक्षिका एक ते चार वर्गांना शिकवीत असल्याची त्यांनी सांगितलं. 28 पैकी फक्त पाचच मुलांना इंग्रजी चांगली वाचता येते तर इतर 23 मुलांची इंग्रजी कच्ची असल्याचे त्यांनी सांगितले.

Popular Articles