spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा नगर परिषदेतर्फे सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती नाट्यप्रयोग

खापा, वार्ताहर :- नगर परिषद खापाच्या वतीने प्रभाग आठ येथील शिक्षक कॉलोनी, नवीन वस्ती येथे माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोदरेज फीडबॅक फाउंडेशन यांच्या सहकार्याने सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती अभियानासाठी जनजागृतीपर नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत पंचतत्त्वे “भूमी, जल, वायू, आकाश आणि अग्नी” यांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. उघड्यावर कचरा टाकल्यामुळे होणारे दुष्परिणाम तसेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारी हानी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्येक घरातून ओला, सुका, सॅनिटरी व घातक अशा चार प्रकारचा कचरा वेगळा करून घंटागाडीला दिल्यास होणारे फायदे नागरिकांना पटवून देण्यात आले. तसेच सिंगल यूज प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षणास कशी मदत होते, याबाबतही जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी सचिन राऊत, वैभव गोळे, राहुल चव्हाण, प्रदीप परतेती, राहुल बावनकुळे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पियूष राजेंद्र बुरडे, न. प. उपाध्यक्ष सुनील सुधाकर पाहुणे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये नागपूर विभागातून प्रथम क्रमांक मिळविण्यास व शहरात प्रभावी जनजागृती करण्यास विशेष सहकार्य करणारे गोदरेज फीडबॅक फाउंडेशन ट्रस्टचे निरीक्षक पवन वाधवा, संगीता घोराई, प्रोजेक्ट तांत्रिक सल्लागार आकाश दीप, प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र पासवान, मनोज बडवाईक व त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून सिंगल यूज प्लास्टिक मुक्त खापा शहराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Popular Articles