spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राम मंदिर भव्य शोभायात्रा कार्याचा शुभारंभ “श्रीरामाचे जयघोषाने दुमदुमला परिसर”

नागपूर :- पश्चिम नागपूर नागरिक संघ अंतर्गत श्रीराम मंदिर रामनगर येथे, रामनवमी शोभायात्रा नामफलकाचे विमोचन शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी, जेष्ठ विधीज्ञ आनंद परचूरे, डॉ. परिणिता फुके, मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, विश्वस्त दिपक खिरवडकर यांचे हस्ते संपन्न झाले. गणमान्य नगरसेवक योगेश पाचपोर, विनोद कन्हेरे, धनश्री देशपांडे, वर्षा चौधरी, ऋतिका मसराम, विजय होले यांचे हस्ते दीप प्रज्वलनानंतर, श्रीराम नवरात्र, हनुमान जन्मोत्सव, व शोभायात्रा अशा विविध कार्यक्रमांच्या आयोजन कार्यांचा शुभारंभ झाला. प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित युवा, महिला व भक्तांनी केलेल्या प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन उपाध्यक्ष मुकुंद सरमुकद्दम, विश्वस्त अशोक केदार व डॉ. हेमांगी अभ्यंकर, संचालन विश्वस्त मृणाल पुराणिक तर आभार उपाध्यक्ष ॲड. राहुल पुराणिक यांनी मानले. याप्रसंगी मंदिराचे जेष्ठ पदाधिकारी श्रीराम सावरकर, अशोक आग्रे, मदन देशपांडे, दत्तूजी खरे, विनोद जोशी, डॉ.वृषाली शिलेदार, सदस्य यशवंत जानवे, उपस्थित होते. असे पश्चिम नागपूर नागरिक अध्यक्ष रवी वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles