spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“स्वप्न निकेतन’ सोसायटीत शांतता बैठकीत सुरक्षा विषयांवर मार्गदर्शन

– पोलीस निरीक्षकांनी होळीच्या पार्श्वभूमीवर घेतली शांतता बैठक

नागपूर :- येथील स्वप्न निकेतन सोसायटी मध्ये शांतता, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने विशेष शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून सतीश हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कपिल नगर पोलीस ठाणे उपस्थित होते. तसेच कपिल नगर पोलीस ठाण्याच्या शांतता समितीचे सदस्य ओमप्रकाश साहू यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले. बैठकीत होळी व धूरवडीच्या दिवसांतील खबरदारी, चोरीच्या घटनांपासून बचाव, लहान मुले चोरणाऱ्या टोळ्यांबाबत जागरूकता, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे महत्त्व, पोलिसांची मदत व पोलीस मित्र योजना, तसेच सोसायटीतील वाद शांततेने कसे सोडवावेत या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कुलदीप दवंडे, गजानन भोंबले, रवी नानने, अमोल सोनटक्के, दीपक भावे, विवेक वाघमारे, आरिफ शेख, नंदकिशोर भोसले, विकास शेंडे, आतिश ठाकरे, अरविंद शेंडे, अभिलाष वासनिक, मंगला गुप्ता, आम्रपाली बागडे, सोनल वाघमारे, शिल्पा खरवडे, वंदना शेंडे व टीना वासनिक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोसायटी सदस्य सुदर्शन बागडे यांनी केले. या बैठकीमुळे सोसायटीमध्ये शांतता व सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Popular Articles