spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वस्त सोने देण्याच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक

– आरोपी अटक, मुद्देमाल जप्त

कळमेश्वर :- फिर्यादी राजु जयसिंग साठिया, वय ३६ वर्ष, रा. गोंडखैरी कार्ली शिवार यांनी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे तकार दिली की, फिर्यादी यास स्वस्तात सोने देतो असे म्हणुन कर्नाटक येथील आरोपी नामे कृष्णा कुंभारे, वय ३० वर्ष, रा. विजयपुर, कर्नाटक याने फिर्यादीची १७,००,०००/- रूपयांची फसवणूक केली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम ३१८(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद आहे. कळमेश्वर पोलीस सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुध्दा समांतर तपास सुरू केला.

हर्ष ए. पोहार पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयात समांतर तपासादरम्यान संशयित आरोपीचे शोधकामी पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांचे परवानगीने राज्य कर्नाटक येथे रवाना होऊन संशयित अनोळखी आरोपीचा गोपनीय बातमीदाराचे तसेच स्थानिक पोलिसांचे मदतीने शोध घेतला, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित आरोपीचे खरे नाव कृष्णा कुंभारे नसून त्याचे नाव फकीरप्पा निलप्पा बेल, वय ३० वर्षे रा. कोनानताविगी, ता राणेबेन्पुर, जि. हावेरी, राज्य कर्नाटक असल्याचे माहिती प्राप्त झाली. पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास त्याच्या राहते परीसारातुन ताब्यात घेतले. आरोपीस गुन्हयाबाबत विचारपूस केली असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

पेलीसांनी पंचसमा आरोपीकडुन १) रोख रक्कम किमती १७,००,०००/-रुपये २) एक अँड्रॉइड मोबाईल किंमती १०,०००/- रुपये ३) तीन कीपैड मोबाईल किंमती २,५००/- रुपये असा एकूण १७,१२,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कळमेश्वर पोलीसांनी आरोपीला अटक केले आहे.

Popular Articles