spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनता दरबारात माजी मंत्री मुळक यांनी ऐकल्या नागरिकांच्या तक्रारी

सचिन चौरसिया रामटेक २२ :- देवलापार व रामटेक येथील माजी मंत्री व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार शनिवार, दिनांक १९ जुलै ला संपन्न झाला. जनता दरबारामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. या जनता दरबारात खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला. प्रत्येक नागरिकाची समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाहीसाठी सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, नागरिकांकडून आलेली निवेदने स्वीकारत त्यांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही सुद्धा या निमित्ताने देण्यात आली. जनता दरबाराच्या माध्यमातून भविष्यातही जनतेच्या हितासाठी कार्यरत राहू, असा विश्वास खासदार श्यामकुमार बर्वे व राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला. जनता दरबाराला शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक आलेले होते.

रामटेक रेल्वेच्या मुद्द्यावर चर्चा

यादरम्यान रामटेक तालुक्यातील पत्रकारांनी रामटेक रेल्वे लाईन खात रेल्वे स्टेशन पर्यंत जोडण्यात यावी याबाबत विषय मांडला असता खासदार श्याम बर्वे तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी यावर सकारात्मक उत्तर देऊन यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे व याबाबतचा एक प्रस्ताव वरच्या स्तरावर देण्यात आला असल्याचेही सांगितले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.